Thursday, 23 April 2026

उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेबरोबर ५ हजार २०० कोटींचा करार

 उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेबरोबर ५ हजार २०० कोटींचा करार

 

उदंचन प्रकल्पाच्या माध्यमातून राष्ट्रीय ग्रीड स्थिर ठेवण्याची राज्यात क्षमता निर्माण होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

- तीन प्रकल्पातून ११०० मेगावॅट वीज निर्मिती क्षमता स्थापित होणार

- १११० रोजगार निर्मिती होणार

- राज्यातील उदंचन प्रकल्पांची ८० हजार मे.वॅ. वीज निर्मिती क्षमता

 

मुंबई, दि. २३ - जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  तीन उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सुमारे ५ हजार २०० कोटी रुपयांचा आज  सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षमतेत वाढ करण्यासाठी हा करार महत्त्वाचा टप्पा ठरणार असून या माध्यमातून कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर ऊर्जा साठवणूक करून राष्ट्रीय ग्रीड स्थिर ठेवण्याची क्षमता राज्यात निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

 

वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंपदा सचिव संजय बेलसरे, आमदार डॉ. विनय कोरे, नवशक्ती निर्माण संस्थेचे अध्यक्ष नामदेव एच. पाटील, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi