महाराष्ट्र लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिन साजरा
मुंबई, दि. 17 : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत शुक्रवारी लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्यांचा राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मुंबई महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीच्या सहकार्याने सादर करण्यात आला.
यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राजस्थान व ओडिशा राज्यांच्या लोकगीत व नृत्याला राज्यपालांनी शाबासकी दिली. विद्यार्थ्यांनी राजस्थानचे चरी नृत्य 'केसरीचा बालमा' या गीतासह सादर केले तसेच ओडिशाचे संबलपुरी ढलकाई नृत्य लोकगीतासह सादर केले.
भारत सरकारच्या 'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमाचा भाग म्हणून राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिवस लोकभवन येथे आयोजित करण्यात आला होता.
No comments:
Post a Comment