नवी मुंबईत स्पोर्ट्स सिटीच्या प्रस्तावित क्षेत्रामध्ये स्टेडियम उभारणीचा पर्यायही विचाराधीन असून, त्या ठिकाणी सुमारे 50 टक्के जमीन आधीच संपादित झालेली आहे. उर्वरित जमीन टप्प्याटप्प्याने संपादित करून प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश मंत्री अॅड. शेलार यांनी दिले.
या प्रकल्पासाठी आवश्यक आराखडा तयार करण्याबरोबरच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे तसेच त्यापूर्वी जागेचे निश्चितीकरण आणि मूलभूत नियोजन पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश मंत्री ॲड. शेलार यांनी दिले.
स्टेडियम प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचेही निर्देश मंत्री ॲड.शेलार यांनी दिले.
स्टेडियमसाठी सुमारे 40 एकर जागा आणि इतर पूरक सुविधांसाठी अतिरिक्त 30 एकर जागेची आवश्यकता भासू शकते, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत प्राथमिक अहवाल सादर करून त्यानंतर पुनरावलोकन बैठक घेण्यात येणार आहे
No comments:
Post a Comment