नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोजन
– सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई, दि. 1 : नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी योग्य जागेची निवड करताना कनेक्टिव्हिटी, वाहतूक व्यवस्था, पार्किंग सुविधा आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा सर्वंकष विचार करावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.
नवी मुंबई येथे जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्यासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. या बैठकीस उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी तसेच सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment