Wednesday, 15 April 2026

ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेळी/मेंढी/गाय/म्हैस/कुक्कुटपालन यांचा समावेशआता या निर्णयानुसार वराह पालनाला चालना

 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेळी/मेंढी/गाय/म्हैस/कुक्कुटपालन यांचा समावेश आहे. आता या निर्णयानुसार वराह पालनाला चालना देण्यासाठी वराह पालन गट वाटप योजना’ समाविष्ट करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ५+१ वराह गटविमा आणि आवश्यक पायाभूत सुविधा यांचा समावेश असलेला सुमारे २.०८ लाख रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सर्वसाधारण लाभार्थ्यांना ५० टक्के तर अनुसूचित जाती-जमातींना ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेत सर्वसाधारण प्रवर्गअनुसूचित जातीअनुसूचित जमातीमधील भूमिहीनअल्पभूधारकमहिला बचत गट आणि सुशिक्षित बेरोजगारांना प्राधान्य देण्यात येणार असून महिलांसाठी ५० टक्के तर दिव्यांगांसाठी ५ टक्के आरक्षण लागू राहणार आहे. लाभार्थ्यांना पशुपालनाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य करण्यात आले असून स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली खरेदी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

उद्योजकता विकास योजनेअंतर्गत ४ टक्के व्याज सवलत योजना ही शेळी/मेंढी/गाय/म्हैस/कुक्कुटपालन या पशुपालन व्यवसायाबरोबरच वराह पालन व्यवसायालाही लागू करण्यात आली आहे. यामुळे पशुपालन क्षेत्रात गुंतवणूक वाढून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याची अपेक्षा मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi