Wednesday, 15 April 2026

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन देण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

 अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन देण्यासाठी

३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

·         सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

 

मुंबईदि. १३ : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने निवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.

 

अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण संदर्भात न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर (निवृत्त न्यायाधीशउच्च न्यायालयपाटणा) यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त एक सदस्यीय समितीने दिनांक १६ मार्च २०२६ रोजी आपला अहवाल शासनास सादर केला होता. या अहवालावर आक्षेपमते व निवेदन मागविणे तसेच त्यावर सुनावणी घेण्यासाठी शासन निर्णय १० एप्रिल २०२६ अन्वये मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.

या समितीसमोर अहवालाबाबत मतेआक्षेप करण्यासाठी इच्छुकांना ई-मेलद्वारे नोंदणी करण्याकरिता यापूर्वी १५ एप्रिल २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसारसंबंधितांना आपले आक्षेप किंवा मते सादर करण्यासाठीची अंतिम मुदत आता ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. इच्छुकांनी dg-sw@barti.in या ई-मेल आयडीवर आपले निवेदन किंवा अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi