या बैठकीत प्रत्येक महाविद्यालय व रुग्णालय यांच्या बांधकामांची प्रगती, निधी वितरण, मनुष्यबळ नियोजन तसेच आवश्यक सुविधा उभारणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. काही ठिकाणी कामांना गती मिळाली असली तरी काही प्रकल्पांबाबत तातडीने सुधारात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश मंत्री मुश्रीफ यांनी दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामास होत असलेल्या दिरंगाई बद्दल संबंधित कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देशही वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी दिले.
रुग्णालयीन सुविधा, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, विद्यार्थी वसतिगृहे आणि प्राध्यापकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा यांची उभारणी नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पांच्या पूर्णत्वानंतर संबंधित भागातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीस वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव संदीप ढाकणे उपस्थित होते तसेच संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment