मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन
निर्यात केंद्रीत खाद्यउद्योगासाठी शासन सहकार्य करेल
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे दि.१६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रांजे येथे उभारण्यात आलेल्या चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आले. नव्या काळांची आव्हानांना सामोरे जावून ग्लोबल ब्रँड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूनी दाखविला आहे. ग्लोबल ब्रँड झालेल्या ‘चितळे बंधू’ आणि राज्यातील खाद्य उद्योगाला प्रगत ब्रँडच्या रुपात जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, शंकर मांडेकर, इंद्रनील चितळे, गोविंद चितळे, श्रीकृष्ण चितळे, केदार चितळे आदी उपस्थित होते.
व्हिजन पार्कच्या माध्यमातून खाद्य उद्योगातील आधुनिक सुविधा उभ्या रहात असल्याबद्दल समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चितळे बंधूंची दूरदृष्टी या सुविधेतून पहायला मिळते. स्वच्छता आणि शुद्धतेच्या बाबतीत कुठेही मानवी हस्तक्षेप नसलेली उत्तम दर्जाची यंत्रणा या पार्कमध्ये उभारण्यात आली आहे. परदेशी यंत्रांमध्ये अनुभवाच्या आधारे आवश्यक बदल करून ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. नूतनीकरणीय ऊर्जेचा उपयोग इथे करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment