Thursday, 16 April 2026

मॅजिक बस इंडिया फाउंडेशन’चा

 या उपक्रमाचा प्रत्यक्ष परिणाम स्पष्ट करताना रावल यांनी मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचा उल्लेख केला. या संस्थेने वंचित आणि दुर्लक्षित घटकांतील मुलांसोबत काम करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणेजीवनकौशल्ये विकसित करणे आणि शाश्वत रोजगाराच्या संधी मिळवून देणे यासाठी मोठे योगदान दिले आहे. गेल्या १५ वर्षांत एका पिढीला अनिश्चिततेतून संधींकडे आणि असुरक्षिततेतून आकांक्षेकडे नेण्याचा हा प्रवास आहेअसे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अक्षय पात्र फाउंडेशनच्या माध्यमातून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्न मिळत असूनत्यामुळे त्यांच्या शिक्षणात सातत्य राखले जात आहेअशी माहिती त्यांनी दिली. 

 

टाटा मुंबई मॅरेथॉनमुळे महाराष्ट्राला जागतिक स्तरावर ओळख मिळाली असून६० हून अधिक देशांतील सहभागामुळे राज्याची मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्याची क्षमता अधोरेखित झाली आहेअसेही त्यांनी नमूद केले. हा उपक्रम विश्वासाचा क्षणपरिवर्तनाची शक्ती आणि भारत काय साध्य करू शकतो याचे द्योतक आहेअसे सांगत रावल यांनी आपण केवळ अंतरासाठी नव्हेतर बदलासाठी धावूयाअसे आवाहन केले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi