Thursday, 16 April 2026

टाटा मुंबई मॅरेथॉन परिवर्तनाचा मंच

 टाटा मुंबई मॅरेथॉन परिवर्तनाचा मंच

-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. १५ - टाटा मुंबई मॅरेथॉन ही केवळ मॅरेथॉन नसून सामूहिक देणगीची शक्ती अधोरेखित करणारा परिवर्तनाचा मंच आहेअसे प्रतिपादन राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

 

हॉटेल ट्रायडेंट येथे टाटा मुंबई मॅरेथॉन आयोजित ग्रॅटिट्यूड कार्यक्रमात राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मॅरेथॉनसाठी योगदान दिलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राजशिष्टाचार मंत्री रावल यांनी 'ही धाव अंतरासाठी नाही तर बदलासाठी आहेया शब्दात या उपक्रमाचे कौतुक केले.

 

राजशिष्टाचार मंत्री रावल म्हणालेदोन दशकांपूर्वी प्रोकॅम इंटरनॅशनलने मांडलेली ही संकल्पना आज जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धांपैकी एक बनली आहे. त्याचप्रमाणे ही मॅरेथॉन एक प्रभावी परोपकारी व्यासपीठ म्हणून उभी राहिली आहे. या मॅरेथॉनद्वारे आतापर्यंत ७५०० कोटी रुपयांहून अधिक निधी उभारण्यात आला असूनयावर्षीच सुमारे ७६० कोटी रुपयांची देणगी जमा झाली आहे. उद्दिष्ट आणि योग्य रचना यांचा संगम झालाकी मोठ्या प्रमाणावर परिणाम साधता येतोयाचे हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi