विधिमंडळात विद्यार्थ्यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि
मंत्री आदिती तटकरे यांच्याशी साधला संवाद
मुंबई, दि. १७ : विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळा येथील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला भेट दिली. या भेटीत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि मंत्री आदिती तटकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी अतिशय सोप्या आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत विधिमंडळाचे कामकाज उलगडून सांगितले. “जशी शाळेत शिस्त पाळली जाते, तसेच विधानभवनातही नियमांचे काटेकोर पालन केले जाते. नियम मोडल्यास इथेही शिक्षा होते,” असे सांगत त्यांनी वरिष्ठ व कनिष्ठ सभागृह, सदस्यांची रचना आणि नियमांची अंमलबजावणी याबाबत रंजक उदाहरणांसह माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने प्रश्न विचारत संवाद रंगवला.
No comments:
Post a Comment