Tuesday, 28 April 2026

प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेली प्राथमिक मराठी चालकांना शिकवण्यासाठी शासन विविध उपाययोजना

 प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेली प्राथमिक मराठी चालकांना शिकवण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत आहे. या उपक्रमात मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांसारख्या संस्थांचे तसेच साहित्यिकांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. याशिवाय रिक्षा व टॅक्सी संघटनांनीही मराठी शिकवण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी ठराविक मुदत द्यावी, ही संघटनांची मागणी योग्य असून त्यावर सकारात्मक विचार सुरू आहे. तथापि, मराठी भाषा शिकणारच नाही अशी मजुरी दाखवणाऱ्यांच्या बाबतीत मात्र कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्री सरनाईक यांनी दिला. तसेच मंगळवारी परिवहन आयुक्तालयात राज्यातील ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi