Tuesday, 28 April 2026

चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार

 चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

•          पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उभाराव्यात

•       श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक

 

मुंबई, दि. 27 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श कायम स्मरणात राहणार आहे. त्यांच्या जीवनकार्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने चौंडी गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक विकासकामे हाती घेण्यात आलेली आहेत. चोंडीचा विकास सर्वसमावेशक व नियोजनबद्ध पद्धतीने करत दर्जेदार सुविधांच्या माध्यमातून पर्यटनास चालना देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळ, चोंडी येथील जतन, संवर्धन व विकास आराखड्यासंदर्भात बैठक वर्षा निवासस्थान येथे झाली. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi