Friday, 17 April 2026

मुंबई उपनगर जिल्ह्यात ८६९ रुग्णांना सुमारे ८.१० कोटींची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

 मुंबई उपनगर जिल्ह्यात ८६९ रुग्णांना सुमारे ८.१० कोटींची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

 

मुंबईदि.१७ : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी 'आधारठरत आहे.  मुंबई उपनगर  जिल्ह्यात आर्थिक वर्षात ८६९  रुग्णांना सुमारे ८  कोटी १०  लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.

              मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापनापेपरलेस अर्ज प्रक्रियातातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करारक्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालयधर्मादाय रूग्णालयसंस्थादाते आदींच्या सहकार्य लाभत आहे.

            मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. परिणामीअधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi