Wednesday, 8 April 2026

मिरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा

 मिरा रोड येथील बहुउद्देशीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा

-सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

 

मुंबईदि. ८ : राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मिरा रोड घोडबंदर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय इमारतीच्या आवारात उभारला जाणार आहे. या प्रकल्पाशी संबंधित प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून पुतळा उभारणीचे काम तातडीने सुरू करावेअसे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi