माय भारत बजेट क्वेस्ट 2026 ची अंतिम फेरी मुंबई येथे 12 व 13 एप्रिल रोजी
- ‘नारी शक्तीः विकसित भारताचा आवाज’ थीमवर माय भारत बजेट केस्ट 2026
- अंतिम फेरीत महिला युवा संसद चे आयोजन
मुंबई, दि. 11 - भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत माय युवा भारत द्वारे माय भारत बजेट क्वेस्ट 2026 मुंबई झोनच्या अंतिम फेरीची घोषणा करण्यात आली आहे. या झोनमध्ये महाराष्ट्र, गोवा आणि पुदुच्चेरीचा समावेश आहे. ही दोन दिवसीय अंतिम फेरी 12 व 13 एप्रिल 2026 दरम्यान नवी मुंबईतील नेरूळ येथील डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती माय युवा भारत महाराष्ट्र व गोवा चे राज्य संचालक अमित पुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माय युवा भारत मुंबई चे उपसंचालक अनुप इंगोले उपस्थित होते.
No comments:
Post a Comment