"📢 ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती – “वृद्धाश्रम” व “मातोश्री वृद्धाश्रम” योजना
ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळ सुरक्षित व सन्मानाने व्यतीत करता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत खालील योजना राबविण्यात येत आहेत:
🏠 *“वृद्धाश्रम” योजना (१९६३ पासून)*
🔹 शासन निर्णय दि. २०/०२/१९६३ अन्वये सुरू
🔹राज्यात २९ वृद्धाश्रम (अनुदान तत्त्वावर)
🔹 पात्रता: पुरुष ६० +, स्त्रिया ५५ +
🔹 निराधार, निराश्रीत व अपंग ज्येष्ठांसाठी
✅ सुविधा: मोफत निवास, भोजन, प्रथमोपचार
💰 शासन अनुदान: रु. १५००/- प्रति व्यक्ती प्रति महिना
🏡 *"मातोश्री वृद्धाश्रम” योजना (दि.१७/११/१९९५)*
🔹 २३ वृद्धाश्रम (विना अनुदान)
🔹 क्षमता १०० (५० सशुल्क / ५० नि:शुल्क)
🔹 पात्रता: पुरुष ६०+, स्त्रिया ५५+
💰 उत्पन्न रु. १२,००० पेक्षा जास्त – रु. ५००/- प्रति महिना
💰 रु. १२,००० पेक्षा कमी – शुल्क नाही
👉संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/
📷 @mahasjsa
✉️ @SJSAMaharashtra-mahasjsa
अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयाशी संपर्क साधा.
*सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन*"
No comments:
Post a Comment