NIMHANS च्या क्लिनिकल सायकोलॉजी विभागाच्या प्रा. पूर्णिमा भोला, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ तसेच न्यूरोडायव्हर्जंट मुलाचे पालक डॉ. राधिका बापट आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट सुश्री इशा सोनी यांनी सहभाग घेतला. सत्राचे समन्वयन सौरभ द्विवेदी यांनी केले.
सत्रात मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी (self-care) हा महत्त्वाचा मुद्दा चर्चिला गेला. तज्ज्ञांनी नमूद केले की, मानसिक आरोग्य तज्ज्ञ देखिल माणूस असल्यामुळे रुग्णांच्या समस्यांशी भावनिकदृष्ट्या जोडले जातात आणि त्यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण येऊ शकतो. त्यामुळे सेल्फ केअर ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून कार्यस्थळ, कुटुंब आणि समाज यांनीही त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment