Saturday, 21 March 2026

मुंबई शहर जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

 मुंबई शहर जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

 

मुंबईदि. २० : मुंबई शहर जिल्ह्यातील युवकयुवती तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांसाठीच्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुकांनी ८ एप्रिल २०२६ पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावेतअसे आवाहन मुंबई शहराच्या जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रांत युवांनी बजावलेली भूमिकात्यांचे योगदान आणि समाजविकासातील सहभाग लक्षात घेऊन राज्याच्या युवा धोरणानुसार राज्य व जिल्हास्तरावर हे पुरस्कार दिले जातात. समाजातील दुर्बल घटकअनुसूचित जाती-जमातीआदिवासी भागशिक्षणरोजगारआरोग्यपर्यावरणसांस्कृतिककलाक्रीडामनोरंजनविज्ञान-तंत्रज्ञानव्यवसायमहिला सक्षमीकरणश्रमप्रतिष्ठाव्यसनमुक्ती आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकयुवती आणि संस्थांचा या पुरस्काराद्वारे गौरव करण्यात येतो.

मुंबई शहर जिल्हा परिक्षेत्रातील संबंधित व्यक्ती आणि संस्थांकडून यापूर्वीही प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार २०१९-२० (१ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२०)२०२०-२१ (१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२१)२०२१-२२ (१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२२)२०२२-२३ (१ एप्रिल २०२० ते  ३१ मार्च २०२३)२०२३-२४ (१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२४) आणि २०२४-२५ (१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२२) या वर्षांसाठीच्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. परंतु सामाजिक क्षेत्रात कार्यरत युवकयुवाती व संस्थांचे प्रस्ताव अद्याप अप्राप्त आहेत. त्यामुळे नव्याने पुरस्कारांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार ८ एप्रिलपर्यंत राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुलदुसरा मजलाजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयमुंबई शहरधारावी येथे कार्यालयीन वेळेत अर्ज प्रत्यक्ष सादर करावेतअसे आवाहन मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांनी केले आहे.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi