उमेद’च्या साथीने ‘अन्नपूर्णा फूड ॲण्ड प्रॉडक्टस’ ची लक्षवेधी घौडदौड
व्यक्तीच्या क्षमतांना योग्य मार्गदर्शन, आर्थिक पाठबळ आणि संधींची साथ मिळाली तर तो स्वतःच्या यशस्वी वाटचालीतून, इतरांना प्रेरणा देणारा दिशादर्शक ठरणारा माईलस्टोन प्रवास करतो, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ग्रामविकास विभागातंर्गत ग्रामीन जीवन्नोती अभियानांतून यशस्वी वाटचाल करणाऱ्या अनेक सेल्फमेड उद्योजिका, ज्यांना उद्योग क्षेत्राची, व्यवसायाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना आज घडीला त्यातील किती तरी जणीचे उद्योग व्यवसाय हे लाखांच्या वर आर्थिक उलाढाल करत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील रेणापूरच्या मीराबाई स्वय सहायता संघ, संविधान महिला ग्रामसमूह, सिद्धिविनायक प्रभागसंघ, पाळज येथील इयत्ता १० वी नापास असलेल्या विशेष म्हणजे उद्योगाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या अन्नपूर्णा फूड अँड प्रॉडक्ट्सच्या सर्वेसर्वा सुनीता अशोक कावळे यांचा उद्योजिका म्हणून सुरु असलेला यशस्वी प्रवास प्रेरणादायी आणि अभिनंदनीय आहे.
No comments:
Post a Comment