Friday, 27 March 2026

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवे प्राधिकरण स्थापन करणार

 गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवे प्राधिकरण स्थापन करणार

 -मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. २५ : राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी व्यापक पावले उचलली जात असून युनेस्को मानांकन मिळालेल्या गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी तसेच असंरक्षित किल्ल्यांच्या जतनासाठी स्वतंत्र किल्ले संवर्धन प्राधिकरण स्थापन करणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अँड. आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली.


विधानसभा नियम २९३ अन्वये सांस्कृतिक कार्य विभागासंदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देताना सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, “मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया” या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडकिल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक मानांकन मिळाले आहे. या किल्ल्यांसाठी स्थळ व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येत असून माहिती फलक, जनसुविधा केंद्र, माहिती केंद्र आणि पर्यटन सुविधा उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.


इतिहास जतन करण्याच्या दृष्टीने नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजी भोसले प्रथम यांची ऐतिहासिक तलवार लिलावातून खरेदी करण्यात आली असून ती नागरिकांच्या दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या ही तलवार नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात ठेवण्यात आली असून पुढे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातही प्रदर्शित केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi