Saturday, 7 March 2026

मच्छिमार आणि महिला कामगारांसाठी विश्रामगृह तातडीने खुले करण्याचे

 मच्छिमार आणि महिला कामगारांसाठी विश्रामगृह तातडीने खुले करण्याचे

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

ससून डॉक बाबत घेतली आढावा बैठक

 

मुंबई, दि.४ :ससून डॉक येथील मच्छिमारमहिला कामगार आणि बोटधारकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असूनया परिसराच्या आधुनिकीकरणाला वेग दिला जाईलअशी ग्वाही मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.

 

मंत्रालयात आयोजित एका महत्त्वपूर्ण बैठकीत ससून डॉकच्या आधुनिकीकरणाचा सविस्तर आढावा मत्स्यव्यवसाय व बंदरे  मंत्री नितेश राणे यांनी घेतला. यावेळी मच्छिमारांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.

 

ससून डॉक येथे मत्स्य व्यावसायिक आणि विशेषतः महिला कामगारांसाठी शासनाने बांधलेले विश्रामगृह तातडीने खुले करावेअसे स्पष्ट निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले. यामुळे कामाच्या ठिकाणी महिलांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

 

             बोटधारक आणि व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या तांत्रिक तसेच प्रशासकीय अडचणींवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

 

 मासे उतरवणेसाठवणूक आणि विक्री या साखळीत मच्छिमारांना कोणत्याही अडचणी येऊ नयेतयासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर देण्यात आला.

 

या बैठकीला आमदार राजेश राठोडमत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीसंबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि मच्छिमार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi