Wednesday, 18 March 2026

नेत्ररोग तज्ज्ञ आयुर्वेद वैद्यकांच्या शस्त्रक्रिया अधिकाराबाबत शासन सकारात्मक

 नेत्ररोग तज्ज्ञ आयुर्वेद वैद्यकांच्या शस्त्रक्रिया अधिकाराबाबत शासन सकारात्मक

 - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबईदि. १७ पदव्युत्तर आयुर्वेद वैद्यांच्या हक्कांवर गदा येत असल्यासत्या आदेशाचा पुनर्विचार करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

शालाक्य तंत्र (नेत्ररोग) विषयातील पदव्युत्तर आयुर्वेद वैद्यकांच्या वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया अधिकारांबाबत आयोजित बैठकीत मुश्रीफ बोलत होते. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त अनिल भंडारी, सार्वजनिक आरोग्य विभाग संचालक नितीन अंबाडेकर ,आयुष संचालनालयाचे संचालक रमण घुंगराळेकर,वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहसचिव सुवर्णा खरात,आरोग्य विभागाचे उपसचिव तसेच संबंधित अधिकारी आणि वैद्य उपस्थित होते.

या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यात समन्वय साधून यावर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. राज्यातील आयुर्वेद क्षेत्रातील तज्ज्ञांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi