अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विद्यापीठ परिसरात सावित्रीबाई फुले यांचा कांस्य पुतळा देण्याची घोषणा करत, या पुतळ्यामुळे विद्यार्थिनींना सावित्रीबाईंच्या क्रांतिकारी कार्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. स्त्रीशिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिराव फुले यांच्या योगदानाची विस्तृत माहिती मंत्री भुजबळ यांनी उपस्थितांना दिली. पुरस्कार म्हणजे थांबायचा टप्पा नसून अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा आहे, असा संदेश देत त्यांनी महिलांच्या शिक्षणाचे देशाच्या प्रगतीतील महत्त्व अधोरेखित केले.यावेळी पुरस्कारार्थींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र तसेच रोख पारितोषिक प्रदान करून सत्कार करण्यात आला. २०२३–२४ या वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर विभागातून संगिता संजय बाविस्कर (छत्रपती संभाजीनगर), नाशिक विभागातून निवेदिता सुनील ताठे (जळगाव), पुणे विभागातून सौ. संगिता किरण राणे (कोल्हापूर), नागपूर विभागातून नंदा अशोक कोल्हाटकर (नागपूर), अमरावती विभागातून निलिमा वसंतराव काळे (यवतमाळ) आणि कोकण विभागातून जयश्री परशुराम पाटील (नवी मुंबई) यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे सन २०२४–२५ या वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर विभागातून सुनिता माणिकराव मुळे (हिंगोली), नाशिक विभागातून बेबीताई अशोक गायकवाड (अहिल्यानगर), पुणे विभागातून अनुराधा दीपक भोसले (कोल्हापूर), नागपूर विभागातून डॉ. किरण राधेश्याम मेश्राम (नागपूर) आणि कोकण विभागातून डॉ. अॅड. मिता संजय गंगावणे (नवी मुंबई) यांना गौरविण्यात आले
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment