Sunday, 22 March 2026

कोपा बंधाऱ्यांचे रुपांतर बॅरेजमध्ये करण्याचे धोरण

 कोपा बंधाऱ्यांचे रुपांतर बॅरेजमध्ये करण्याचे धोरण ठरविले असून कार्यवाही करत आहोत. दौंडश्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील मागील भागातील गावांना पाण्याचा तुटवडा जाणवू नयेयासाठी मोठे बॅरेज उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. लाभ क्षेत्राबाहेरील चिबड जमिनीसंदर्भात शासनाने प्रायोगिक तत्वावर प्रकल्पाला मान्यता दिली असून एक ते दोन महिन्यांत त्याची अंमलबजावणी सुरू होईलअसे मंत्री विखे - पाटील म्हणाले.

पुरंदर उपसा सिंचन योजनेतील पाण्याच्या वाटपाबाबत निर्माण होणारा वाद टाळण्यासाठी संबंधित आमदार व विभागांशी बैठक घेऊन समन्वयातून मार्ग काढला जाईलअसेही मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले. तसेच डिंबे धरणाशी संबंधित प्रलंबित बोगदा प्रकल्पालाही लवकरच मंजुरी देऊन काम सुरू करण्यात येईलअशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi