जैन समाजाची सेवा, त्याग व अहिंसेची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी
मुंबई, दि. २१ : जैन समाजाने समाजसेवा, दानधर्म, अहिंसा आणि त्याग या मूल्यांवर आधारित कार्यातून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. लोकभवन येथील दरबार हॉलमध्ये संपन्न झालेल्या ६४ व्या जैन दीक्षा समारंभप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमास राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, अध्यात्म परिवार ट्रस्टचे विश्वस्त व देणगीदार बाबूलालजी बन्साली, हितेंद्र माणेकजी, राजेश चंदन तसेच अध्यात्म परिवार ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते.
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, जैन समाज देशभरात विविध माध्यमांतून समाजहिताचे कार्य करीत असून सेवा हीच जैन धर्माची ओळख आहे. ६४ जणांनी दीक्षा स्वीकारणे ही बाब अत्यंत प्रेरणादायी असून, त्यातून संयम, साधेपणा आणि आध्यात्मिकतेचा संदेश समाजाला मिळतो. भगवान महावीरांनी दिलेला अहिंसा, अपरिग्रह आणि अनेकांतवादाचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले. संवाद, सहिष्णुता आणि सर्व जीवसृष्टीबद्दल करुणा या मूल्यांमधूनच शांतता आणि शाश्वततेचा मार्ग सापडू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले
No comments:
Post a Comment