नांदेडमध्ये ५०० खाटांचे रुग्णालय उभारणार
–सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
- शासकीय रुग्णालयांची सेवा अधिक सक्षम करण्यावर भर;
मुंबई, दि. १७ : नांदेड जिल्हा रुग्णालयाचे ५०० खाटांपर्यंत श्रेणीवर्धन करून ते उभारण्यासाठी निधीचा तरतूद करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. राज्यात शासकीय रुग्णालयांची सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असून, विविध आरोग्य योजनांद्वारे नागरिकांना परवडणाऱ्या व गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सदस्य श्रीजया चव्हाण यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य तुषार राठोड, राजेश पवार, चंद्रदीप नरके यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment