शिक्षण शुल्क माफीच्या निर्णयामुळे
उच्च शिक्षणातील प्रवेशात मुलींची लक्षणीय वाढ
-उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील
· महिला सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध
मुंबई, दि. १७ :- राज्यातील महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शासनाकडून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. उच्च व तंत्र शिक्षणासाठी मुलींचे शिक्षण शुल्क माफ केल्यामुळे सकारात्मक बदल घडून येत असून मुलींच्या प्रवेशात लक्षणीय वाढ होत आहे असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे २०२३–२४ आणि २०२४–२५ या वर्षांसाठी जाहीर करण्यात आलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारांचा वितरण समारंभ एन.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या सर सिताराम तथा लेडी शांताबाई पारकर दीक्षांत सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमात शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कार्यकर्त्यांना गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, संचालक (उच्च शिक्षण) डॉ. शैलेश देवळाणकर, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. उज्ज्वला चक्रदेव, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदेडकर, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment