नंदुरबार जिल्ह्यातील गंगापूर जमीन संपादन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान परिषदेत निवेदन
मुंबई, दि. १७ : नंदुरबार जिल्हा येथील नवापूर तालुका अंतर्गत मौजे गंगापूर येथील जमीन संपादन प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली.
मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, गंगापूर येथील जमीन संपादन प्रकरणात ५ जुलै २०२३ आणि १२ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आलेल्या मूळ जमीन मालकांच्या यादीत अनुसूचित जमातीच्या व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली होती. तसेच, या प्रकरणात जमिनीची मालकी आदिवासींकडून बिगर आदिवासींकडे बक्षीसपत्राद्वारे हस्तांतरित झाल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. याशिवाय, भू-संपादन निवाड्याशी संबंधित प्रकरणे लवाद व जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित असताना फेरनिवाडा करण्यात आल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले होते.
No comments:
Post a Comment