मनसुखानी महाविद्यालयातील तक्रारींच्या चौकशी अहवालावर आवश्यक कार्यवाही करणार
-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
मुंबई, दि. १७ : उल्हासनगर येथील श्रीमती चांदीबाई हिम्मतला मनसुखानी महाविद्यालयातील कामकाज व इतर काही प्रश्नासंदर्भातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी गठित समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालाच्या आधारे पुढील आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.
सदस्य डॉ. मनिषा कायंदे यांनी या विषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, या महाविद्यालयाच्या निकाल व पुनर्पडताळणी संदर्भातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या डॉ. शिवाजी सरगर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती.
या महाविद्यालयातील नियुक्ती संदर्भात प्राप्त तक्रारीसंदर्भात मंत्री पाटील म्हणाले, संबंधित प्रकरणातील नियुक्ती ही २ जानेवारी १९९८ पूर्वी झालेली आहे. त्या काळात अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारेच पडताळणी करून भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment