Saturday, 28 March 2026

राज्य सरकारने स्वयंपूर्ण विकासासाठी विविध सवलती व धोरणात्मक निर्णय घेतले

 सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध योजना सुरू केल्याचे सांगितले.

राज्य सरकारने स्वयंपूर्ण विकासासाठी विविध सवलती व धोरणात्मक निर्णय घेतले असूनसहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. मुंबई बँकेने गिरणी व माथाडी कामगारांसाठी कर्जसुविधामहिलांसाठी झिरो बॅलन्स खाते उघडण्याची मोहीम आणि व्याजमुक्त कर्ज योजना राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. सहकार भवन उभारणीमुळे आधुनिक सुविधाकार्यशाळा व प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहकारी चळवळीला नवी दिशा मिळेलअसे सहकार मंत्री पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील सहकार चळवळ परंपरेतून उभी राहिली असूनभविष्यातही महिलांना व तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेलअशी अपेक्षा मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविक महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi