Tuesday, 17 March 2026

मजूर सहकारी संस्थांची कामे प्राधान्याने महिला सहकारी संस्थांना देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक

 मजूर सहकारी संस्थांची कामे प्राधान्याने महिला सहकारी संस्थांना देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक

-         सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर

 

मुंबईदि. १७: राज्यामध्ये मजूर सहकारी संस्थांना विविध यंत्रणांमार्फत कामे देण्यात येतात. यामध्ये १० लाख रुपयांच्या आतील कामेई निविदा पद्धतीद्वारे मिळालेली कामे आणि जिल्हा परिषदेच्या यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या कामांचा समावेश आहे. मजूर सहकारी संस्थांना मिळणारी कामे यापुढे प्राधान्याने महिला सहकारी संस्थांना देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक राहिलअसे सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सांगितले.

राज्यातील मजूर सहकारी संस्था व महिला सहकारी संस्थांना कामे वाटप करण्याबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यमंत्री डॉ. भोयर बोलत होते. बैठकीला आमदार सुधीर मुनगंटीवारसहकार विभागाचे उपसचिव नितीन गायकवाडअप्पर निबंधक डॉ. पी. एल. खंडागळेचंद्रपूरचे जिल्हा उपनिबंधक श्री. जे. के ठाकूरजलसंपदा आणि सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी बैठकीत सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi