मुंबईसह राज्यातील नागरिकांना आधुनिक, दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
•लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचा भव्य विस्तार
•३,२८६ खाटांची क्षमता होणार
•हॉस्पिटलसाठी २५०० कोटी होणार खर्च
मुंबई, दि.२७ : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या टप्पा-२ च्या भूमिपूजनमुळे मुंबईसह राज्यातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत. सध्या असलेल्या १९०० खाट संख्येवरून ३,२८६ खाटांची क्षमता रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. रुग्णालयात मुख्य इमारत, कर्करोग, आपत्कालीन सेवा व बाह्यरुग्ण विभाग उभारले जाणार आहेत. यासाठी २५०० कोटी खर्च होणार असून २०३० पर्यंत बांधकाम पूर्ण होणार आहे. राज्य शासन व मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील प्रत्येक नागरिकाला मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment