Tuesday, 24 March 2026

नदीच्या प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडले पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकावर दंडात्मक कारवाईसाठी निर्णय घेणार

 नदीच्या प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडले

 पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकावर दंडात्मक कारवाईसाठी निर्णय घेणार

-         मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

मुंबईदि. 23 : नदीच्या नैसर्गिक पाणी प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडल्याने शेतीला दूषित पाणी मिळत असल्याने पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकावर दंडात्मक कारवाईसाठी निर्णय घेण्यात येईलअशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत दिली.

हवेली तालुक्यातील नदी तीरावरील शेतीला दूषित पाणी मिळत असल्यासंदर्भात आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उत्तर दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi