Wednesday, 18 March 2026

जिगांव धरणाखालील रस्ता कामात बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई; तीन वर्षासाठी ब्लॅकलिस्ट

 जिगांव धरणाखालील रस्ता कामात बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई; तीन वर्षासाठी ब्लॅकलिस्ट

-         जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि.१७ : जिगांव प्रकल्पांतर्गत जिगांव धरणाच्या खालील बाजूस असणाऱ्या रस्ता दुरुस्ती बांधकाम  या  कामाच्या निविदा प्रकरणी मे. निलेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. नंदुरबार यांनी बोगस कागदपत्रे सादर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित कंत्राटदाराविरोधात कारवाई करण्यात येऊन या कंत्राटदारास तीन वर्षासाठी ब्लॅकलिस्ट करण्यात आल्याची माहिती जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) मंत्री  गिरीश महाजन विधान परिषदेत दिली.

सदस्य अभिजित वंजारी यांनी या संदर्भात विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi