Wednesday, 18 March 2026

काही भागांत काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी लक्षात

 काही भागांत काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दक्षता पथके स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील २१ जिल्ह्यांत २,१२९ तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये १,२०८ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून सुमारे ३३ लाख ६६ हजार ४११ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणांत २३ गुन्हे दाखल करून १८ जणांना अटक करण्यात आली आहे.

शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृह, अंगणवाडी आणि शासकीय खानावळींना  टक्के गॅस पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तर इतर घटकांना आवश्यकतेनुसार 50 टक्क्यांपर्यंत पुरवठा केला जाणार आहे.

दरम्यान, गहू व डाळींच्या किमतीत मोठी वाढ झालेली नसून काही ठिकाणी किरकोळ २ ते ४ रुपये वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. नाशवंत मालाच्या वाहतुकीबाबत कंटेनर अडकल्याने निर्माण झालेल्या समस्येवर मुख्यमंत्री स्तरावर चर्चा झाली असून डिमरेज शुल्क माफ करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi