भानू अथैय्या : साधनेतून सन्मानाकडे’
सांस्कृतिक कार्यक्रम 27 मार्च रोजी आयोजन
मुंबई, दि. २१ : सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने भारतीय चित्रपटसृष्टीतील ऑस्कर “अकॅडमी पुरस्कारने गौरविलेल्या प्रख्यात वेशभूषाकार भानू अथैय्या यांच्या जीवनकार्याला अभिवादन करण्यासाठी “भानू अथैय्या : साधनेतून सन्मानाकडे” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे होणार आहे. या कार्यक्रमामध्ये गीत, संगीत, नृत्य, दृकश्राव्य सादरीकरण आणि निवेदनाच्या माध्यमातून भानू अथैय्या यांच्या कलाप्रवासाचा व त्यांच्या यशोगाथेचा उलगडा करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment