Sunday, 22 March 2026

भानू अथैय्या यांनी आपल्या कारकिर्दीत १०० हून अधिक चित्रपटांसाठी वेशभूषा

 भानू अथैय्या यांनी आपल्या कारकिर्दीत १०० हून अधिक चित्रपटांसाठी वेशभूषा रचना केली असूनत्यांच्या कामात भारतीय परंपरासूक्ष्म अभ्यास आणि ऐतिहासिक अचूकता यांचा उत्कृष्ट संगम दिसून येतो. सन १९८३ मध्ये गांधी या चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला होता. ऑस्कर जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय होत्या. त्यांच्या कलेमुळे भारतीय चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली.

या कार्यक्रमात उर्मिला कानेटकरवैदेही परशुरामीमानसी नाईकभार्गवी चिरमुलेकिन्नरी दामासुकन्या काळनअभिनय बेर्डेनकुल घाणेकरअभिजित ठाकूर तसेच मंगला खाडिलकर यांसारख्या कलाकारांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन सुभाष नकाशे व मिनल भिके यांनी केले असूनसंहिता लेखन डॉ. सुवर्णा यांनी केले आहे.

सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री  ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतूनतसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखालीसांस्कृतिक कार्य संचालनालयमुंबई यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असूनमुंबई व परिसरातील नागरिककलाकार व सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या  सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावाअसे आवाहन श्रीराम पांडेसंचालकसांस्कृतिक कार्य संचालनालययांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi