भविष्यातील नियोजित शहरी केंद्र म्हणून कल्याण-डोंबिवली परिसराचा विस्तार होणार असून येथे 2,500 ते 3,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 1,239 कोटींच्या कल्याण रिंग रोड या प्रकल्पाकरिता 600 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भिवंडी-कल्याण मेट्रो 5, उल्हासनगर विस्तार 5-ए आणि कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो 14 मुळे कल्याण हे एमएमआरमधील महत्त्वाचे 'ट्रान्झिट हब' बनेल. ऐरोली-काटई नाका मार्ग 584 कोटींच्या या प्रकल्पामुळे नवी मुंबईशी कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
एमएमआर क्षेत्रातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी युद्धपातळीवर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. प्रदेशातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पोशीर' आणि 'शिलार' या दोन्ही धरणांच्या कामांना तातडीने गती देण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले आहेत.
एमएमआर क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 337 किमी मेट्रो जाळ्यासोबत पॉड टॅक्सी, बोट टॅक्सी, मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी, फ्लायओव्हर, अंडरग्राउंड रस्ते आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांचा एकत्रित आराखडा राबवण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment