ठाण्यात मेट्रोचे जाळे विकसित करण्यात असून कासारवडवली ते वडाळा मेट्रो 4 , मेट्रो 4-ए (गायमूखपर्यंत विस्तार) आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6 या प्रकल्पांमुळे ठाणे-मुंबई कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होईल. ठाणे कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यासाठी 1 हजार 25 कोटी आणि आनंदनगर-साकेत उन्नत मार्गासाठी 880 कोटी खर्च केले जाणार आहेत. त्याचबरोबर रायलादेवी आणि मासुंदा तलावाच्या सुशोभीकरणासह कोलशेत-काल्हेर खाडी पुलासाठी 214 कोटींची तरतूद करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
भविष्यातील नियोजित शहरी केंद्र म्हणून कल्याण-डोंबिवली परिसराचा विस्तार होणार असून येथे 2,500 ते 3,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 1,239 कोटींच्या कल्याण रिंग रोड या प्रकल्पाकरिता 600 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भिवंडी-कल्याण मेट्रो 5, उल्हासनगर विस्तार 5-ए आणि कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो 14 मुळे कल्याण हे एमएमआरमधील महत्त्वाचे 'ट्रान्झिट हब' बनेल. ऐरोली-काटई नाका मार्ग 584 कोटींच्या या प्रकल्पामुळे नवी मुंबईशी कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment