वांद्रे-वरळी सी लिंक व कोस्टल रोडसाठी हवाई आपत्कालीन सुविधांवर भर
- पालकमंत्री ॲड.आशिष शेलार
मुंबई, दि. 6 : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस टँकर उलटून गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत कित्येक तासांहून अधिक काळ प्रवासी अडकले. या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन वांद्रे–वरळी सी लिंक, वर्सोवा–वांद्रे वरळी सी लिंक तसेच संपूर्ण कोस्टल रोडवरील आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर देत यासंदर्भातील प्रस्ताव संबंधित यंत्रणांनी सादर करण्याची कार्यवाही करण्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment