Friday, 27 February 2026

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी १५ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी

१५ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

      मुंबईदि.३१ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाज सेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. सन २०२४-२०२५ व २०२५-२६ या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूक स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांनी आवश्यक पुरस्कारासाठी त्यांचे विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित सहायक आयुक्तसमाज कल्याण यांचेकडे १५ मार्च२०२६ पर्यंत कागदपत्रांसह दाखल करावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कारपद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कारसंत रविदास पुरस्कारलोककवी वामनदादा कर्डक पुरस्कारशाहुफुलेआंबेडकर पारितोषिकडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

या विविध पुरस्काराची जाहिरात व अर्जाचा नमूना संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्तसमाज कल्याण यांचे कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

पुरस्काराची जाहिरात शासनाच्या तसेच सामाजिक न्याय विभाग https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi