Friday, 27 February 2026

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता ३ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता

३ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबईदि. २७ : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सन २०२५-२०२६ या वर्षाकरिता देण्यात येणाऱ्या महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारनटराज पुरस्कारविश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतीवीर राजे उमाजी नाईक या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती व संस्थांनी ३ मार्च २०२६ पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण मुंबई उपनगर यांनी केले आहे.

पुरस्कारासाठी अटी व शर्ती पुढील प्रमाणे :- अर्जदार व्यक्तीसंस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिकसामाजिकसांस्कृतिकआर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील उत्थानासाठी सलग व उल्लेखनीय स्वरूपाचे कार्य केलेले असावे. अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून शासन निर्णयात नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रेकार्याचा सविस्तर अहवालशिफारस पत्रे व प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अपूर्णचुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्काराबाबत अंतिम निर्णय शासनस्तरावर घेण्यात येईल व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

  अर्जाचा नमुनाशासन निर्णयातील सविस्तर अटी व शर्ती तसेच पुरस्कारांबाबतची अधिक माहिती सहायक संचालकइतर मागास बहुजन कल्याणमुंबई उपनगर (चौथा मजलानवीन प्रशासकीय इमारतआर.सी.चेंबुरकर मार्गचेंबुर पुर्व ४०००७१ येथे उपलब्ध असून दि. ३ मार्च २०२६ सायं. ५ पर्यंत संबंधित पुरस्कारासाठीचे प्रस्ताव या कार्यालयास करणेकरीता मुदतवाढ देण्यात आली असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi