Friday, 27 February 2026

कोल्हापूर-रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या

 कोल्हापूर-रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या

- मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबईदि. २७ : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्या कामांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

अणुस्कुरा-गावडी (ता. शाहूवाडीजि. कोल्हापूर) ते लांजा (जि. रत्नागिरी) येथील भांबेड-धनगरवाडी रस्तापावनखिंड-गजापूर-विशाळगड पायथा (ता. शाहूवाडी) ते संगमेश्वर तालुक्यातील देवडे-भोवडे जोडणारा नवीन घाटमार्गराष्ट्रीय महामार्ग १९३ पासून बाजारभोगाव-किसरूळ-काळजवडे-पोंबरे-कोलीक-पडसाळी ते किजिडी घाटास जोडणारा रस्ता या घाटमार्गासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीस आमदार डॉ. विनायक कोरेआमदार किरण सामंतआमदार चंद्रदीप नरकेसचिव (रस्ते) संजय दशपुतेमुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) संतोष शेलारमुख्य अभियंता (कोकण) शरद राजभोजअधीक्षक अभियंता (कोल्हापूर) तुषार बुरूडकार्यकारी अभियंता (विशेष प्रकल्प) चंद्रकांत आयरेकरजिल्हा वन अधिकारी (कोल्हापूर) संजय वाघमोडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोल्हापूर-रत्नागिरी दरम्यानचे हे रस्ते देवडे-भोवडे ते विशाळगड घाटकाजिर्डा ते पडसाळी घाट आणि भांबेड ते गावडी घाट अशा तीन प्रमुख घाटांना जोडतात. सह्याद्री पर्वतरांगांतील लांजा व संगमेश्वर तालुक्यातील अनेक मुख्य गावांना हे मार्ग जोडत असल्याने दळणवळण सुलभ होईलघाटमाथ्यावरील नागरिकांचे जीवनमान उंचावेल तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्हे थेट जोडले जातीलअसे मंत्री भोसले यांनी सांगितले.

वन विभागाच्या आवश्यक सर्व परवानग्या पूर्ण करून रस्त्यांच्या कामांतील अडथळे तातडीने दूर करावेत. आवश्यक ठिकाणी पूलदिशादर्शक फलक बसवावेतघाटमार्गांसाठी योग्य सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच या मार्गांवर एसटी बसेस नियमित धावतील अशा पद्धतीने रस्त्यांची आखणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi