नियममुक्ती व अनुपालन सुलभीकरणासाठी महाराष्ट्र शासनाची गतीमान पावले
§ मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियमनमुक्त (Deregulation Cell Task Force)
कार्यदलाची उच्चस्तरीय बैठक
मुंबई, दि.६ : केंद्र शासनाच्या ‘Compliance Burden Reduction and Deregulation’ (अनुपालन सुलभीकरण व नियममुक्ती) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील (Phase–2) कार्यवाही प्रभावीपणे पूर्ण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या Deregulation Cell Task Force ची बैठक मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
मंत्रालयात आयोजित या बैठकीस विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत नियममुक्ती उपक्रमांतर्गत राज्यास लागू असलेल्या प्राधान्य व ऐच्छिक क्षेत्रांतील सुधारणा, अंमलबजावणीची कार्यपद्धती तसेच कालबद्ध कार्यवाही यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
केंद्र शासनाच्या कॅबिनेट सचिवालयाअंतर्गत कार्यरत Deregulation Cell मार्फत Phase–2 साठी राज्यांना एक सविस्तर राष्ट्रीय डॉकेट प्रदान करण्यात आले असून, त्यामध्ये बंधनकारक व ऐच्छिक प्राधान्य क्षेत्रे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती तसेच क्षेत्रनिहाय सुधारणा शिफारसींचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment