हवामान बदलात भारत नवकल्पना व अंमलबजावणीचे नेतृत्व करेल- हिलरी क्लिंटन
हवामान बदलाच्या लढ्यातील आघाडीवर भारत आणि दक्षिणेकडील देश नवकल्पनांचे नेतृत्व करू शकतात. पर्यावरणासाठी आणि मानव जातीच्या कल्याणासाठी परिणामकारक उपायांकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. यात भारताचीही भूमिका महत्वाची राहणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी केवळ चर्चा नकोत, तर कृती करणे, हीच खरी काळाची गरज आहे, असे श्रीमती क्लिंटन यांनी यावेळी नमूद केले.
पर्यावरण कृती ही केवळ धोरणांची नव्हे, तर राजकारण, बाजारपेठ आणि उद्योग यांच्या वास्तवाची जाण ठेवून पुढे नेण्याची प्रक्रिया असल्याचे श्रीमती क्लिंटन यांनी नमूद केले. दक्षिणेकडील देशातील युवकांकडे स्थानिक पातळीवरील प्रभावी उपाय आहेत; मात्र त्यांना भांडवल, नेटवर्क आणि व्यासपीठाची कमतरता भासते. कल्पना कुठूनही येऊ शकतात, फक्त त्यांना पाठबळ देणे आवश्यक आहे. सार्वजनिक, खासगी आणि सामाजित उत्तरदायित्व क्षेत्रांनी एकत्र येऊन अंमलबजावणीसाठी सक्षम भागीदारी उभी करणे ही काळाची गरज आहे. यासाठी क्लिन्टन ग्लोबल इनिशिएटीव्ह वर्षभर भागीदारांसोबत काम करून निधी, तांत्रिक मदत आणि अंमलबजावणीची साखळी उभी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment