Tuesday, 3 February 2026

उपक्रमाची व्याप्ती आणि उपयुक्तता

 उपक्रमाची व्याप्ती आणि उपयुक्तता

 संयुक्त राष्ट्रांनी २०२६ हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर हा तीन वर्षांचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील नऊ कापूस उत्पादक जिल्ह्यांतील ५ हजारहून अधिक महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेट आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या अंतर्गत महिला शेतकऱ्यांना चांगल्या कृषी पद्धती (जीएपीआणि एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएमयाबाबत प्रशिक्षण देण्यात येईलज्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. राज्य शासन महिला शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानवैज्ञानिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेशी जोडण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. महिला शेतकरी वर्गाला सक्षमकरण्याच्या दिशेने हे निश्चितच एक महत्वपूर्ण पाऊल आहे.

 

            ही तीन वर्षांची भागीदारी स्वयं-सहायता गट (एसएचजीएसआणि महिला शेतकऱ्यांना चांगल्या कृषी पद्धती (जीएपीआणि एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएमस्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करेलज्यामुळे शेती उत्पादनक्षमता वाढून शाश्वत व सक्षम उपजीविका निर्माण होणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi