Tuesday, 3 February 2026

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीस मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

 जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीस मतदान ;

उद्योगआस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

 

मुंबईदि. 2 : राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांमध्ये शनिवार दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक  होत आहे. या निवडणुकीमध्ये  राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावायासाठी उद्योगआस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक आहे, असे परिपत्रक उद्योगउर्जाकामगार व खनिकर्म विभागाने जारी केले आहे.

यानुसारनिवडणूक  होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगारअधिकारीकर्मचारी तसेच कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबरही सुट्टी उद्योगऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनाकारखानेदुकाने इत्यादींना लागू असेल. यात खासगी कंपन्या यामधील आस्थापनासर्व दुकाने व इतर आस्थापनानिवासी हॉटेलखाद्यगृहेअन्य गृहेनाट्यगृहेव्यापारऔद्योगिक उपक्रम किवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्याशॉपिंग सेंटरमाल्सरिटेलर्स आदींना हे आदेश लागू राहणार आहेत.

अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात अधिकारीकर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेलयाची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.

सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये रायगड (पंचायत समित्या - पनवेलकर्जतखालापूरसुधागडपेणउरणअलिबागमुरुड. रोहातळामाणगावम्हसळाश्रीवर्धनमहाडपोलादपूर)रत्नागिरी (मंडणगडदापोलीखेडचिपळूणगुहागररत्नागिरीसंगमेश्वरलांजाराजापूर)सिंधुदुर्ग (वैभववाडीकणकवलीदेवगडमालवणकुडाळवेंगुर्लासावंतवाडी दोडामार्ग)पुणे (जुन्नरआंबेगावशिरुरखेडमावळमुळशीहवेलीदौंडपुरंदरवेल्हेभोरबारामतीइंदापूर)सातारा (खंडाळाफलटणमाणखटावकोरेगाववाईमहाबळेश्वरजावळीसातारापाटणकराड)सांगली (आटपाडीजतखानापूर (विटा)कडेगावतासगावकवठेमहांकाळपलूसवाळवा-ईश्वरपूरशिराळामिरज)सोलापूर (करमाळामाढाबार्शीउत्तर सोलापूरमोहोळपंढरपूरमाळशिरसमंगळवेढासांगोलादक्षिण सोलापूरअक्कलकोट)कोल्हापूर (शाहुवाडीपन्हाळाहातकणंगलेशिरोळकागलकरवीरगगनबावडाराधानगरीभुदरगडआजरागडहिंग्लजचंदगड)छत्रपती संभाजीनगर (सोयगावसिल्लोडकन्नडफुलंब्रीखुलताबादवैजापूरगंगापूरछत्रपती संभाजीनगरपैठण)परभणी (जिंतूरपरभणीमानवतसेलूपाथरीसोनपेठपूर्णापालमगंगाखेड)धाराशीव (परांडाभूमवाशीकळंबधाराशीवतुळजापूरलोहाराउमरगा) आणि लातूर (पंचायत समित्या - अहमदपूरजळकोटउदगीरचाकूररेणापूरलातूरशिरूर (अनंतपाळ)देवणीऔसानिलंगा) यांचा समावेश आहे.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi