Saturday, 3 January 2026

वैद्यकीय अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा खंड क्षमापित पत्राचे वितरण

 वैद्यकीय अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट

 वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा खंड क्षमापित पत्राचे वितरण

 

            मुंबई, दि. 2 : आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यातील 195 वैद्यकीय अधिकाऱ्यांना 'सेवा खंड कालावधीत क्षमापित पत्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. गेली 20 वर्ष प्रलंबित असलेल्या या प्रश्नाची सोडवणूक केल्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्री आबिटकर यांचे आभार मानले. यावेळी डॉक्टरांनी लोकांना अधिक चांगली आरोग्यसेवा देण्याची जबाबदारी पार पाडावी. चांगले काम करावे. तुमच्या हक्काच्या गोष्टी देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री आबिटकर म्हणाले.

नुकतेच 150 डॉक्टरांना 'सेवा खंड कालावधी क्षमापितकेले होते. एकूण 345 डॉक्टरांना पत्र देण्यात आले असूनउर्वरित सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना येत्या महिन्याभरात क्षमापण पत्राचे वितरण करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले. या ऐतिहासिक निर्णयामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक प्रकारचे लाभ मिळू शकणार आहेत. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडुन समाधान व्यक्त होत आहे.

             आरोग्य विभागात 2009 पूर्वी अस्थायी स्वरूपात अनेक वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. 2009 मध्ये या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शासकीय सेवेत समावेश झाला आहे. मात्र सेवा खंड कालावधी क्षमापित नसल्याने त्यांना इतर लाभापासून वंचित राहावे लागत होते. वैद्यकीय अधिकारी यांचे संघटनेकडून याबाबत वारंवार मागणी होत होती. त्या अनुषंगाने आरोग्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे सर्व पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा खंड क्षमापित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची सलग सेवा ग्राह्य धरण्यात येणार असून त्यामुळे इतर आर्थिक व प्रशासकीय लाभ त्यांना मिळतील.

            आरोग्यव्यवस्थेत समर्पित सेवा देण्याचा निश्चय करूयाया निर्णयामुळे आरोग्य सेवेत गुणात्मक वाढ होईल. नक्षलग्रस्त आदिवासी व डोंगरी भागात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनसह विशेष इन्सेटिव्ह देण्यासाठी देखील वित्त विभागास प्रस्ताव पाठवला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरु झाली असुन उपचारासाठी मान्य असलेल्या आजारांची संख्या वाढवून 2399 करण्यात आली आहे . तज्ञ डॉक्टरांच्या मानधनातही भरघोस वाढ केली असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपसचिव केंद्रेसहसंचालक राजेंद्र भालेरावअवर सचिव गायकवाडमुख्य प्रशासकीय अधिकारी कारेगावकरआरोग्य विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi