सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि कार्य आजही तितकेच समर्पक आणि प्रेरणादायी आहेत. शिक्षण, समानता आणि मानवता या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीसाठी त्यांचे जीवन प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरते.
सावित्रीबाई फुले थोडक्यात जीवनपट
पूर्ण नाव : सावित्रीबाई जोतिराव फुले
जन्मतारीख : ३ जानेवारी १८३१
जन्मगाव : नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, महाराष्ट्र
वडिलांचे नाव : खंडोजी नेवसे पाटील
कार्य / योगदान :
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका
पुणे येथे पहिली मुलींची शाळा (१८४८) सुरू केली
स्त्री शिक्षण, बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी कार्य
बालहत्या प्रतिबंध, विधवाविवाह, स्त्री-पुरुष समानता यांसाठी समाजसुधारणा
सत्यशोधक समाजाच्या कार्यात सक्रिय सहभाग
प्लेग साथीच्या काळात रुग्णसेवा
मृत्यू :
१० मार्च १८९७
पुणे, महाराष्ट्र (प्लेगग्रस्त रुग्णांची सेवा करताना संसर्गामुळे निधन)
ओळख :
भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका
थोर समाजसुधारिका, कवयित्री व शिक्षणतज्ज्ञ
No comments:
Post a Comment